हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पितृपक्षाचा काळ संपला की लगेच नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. त्यानंतर लगेच दसरा आणि दिवाळी सण लगबग करत येतात. नोव्हेंबर महिना सुरू झाला की, हिवाळ्याची चाहूल जाणवू लागते. थोडक्यात काय तर याकाळात राज्यात शरद ऋतूच्या आगमनासह अनेक सण उत्सव देखील चालू होतात. एकदा नवरात्रीला सुरुवात झाली की, त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतचा काळ सण उत्सवांनीच भरलेला असतो. चला तर मग जाणून घेऊयात या काळात कोणते सण उत्सव कोणत्या तारखेला आपल्या आनंदी वातावरणात भर घालण्यासाठी आले आहेत.
नवरात्र उत्सव आणि दसरा
पितृपक्षाचा काळ संपला की, 15 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर काळात नवरात्र उत्सव साजरी केला जाईल. 21 ऑक्टोंबर रोजी महाअष्टमी आहे. त्यामुळे अनेकठिकाणी महालक्ष्मी देवीचे व्रत करण्यात येईल. पुढे 23 ऑक्टोंबरला दुर्गानवमीचा उपास केला जाईल. नवरात्रोत्सवाची सांगता झाली की, 24 ऑक्टोंबर रोजी दसरा सण आला आहे. हा सण आपट्याची पाने वाटून सरस्वतीची पूजा करून आपण साजरी करतो.
कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी
दसरा संपला की 28 ऑक्टोंबर रोजी शरद पौर्णिमा आली आहे. ज्यालाच आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो. या दिवशी आपण गोड खीर बनवून लक्ष्मी देवीची पूजा करतो. कोजागिरी पौर्णिमा झाली की, 9 नोव्हेंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आली आहे. 12 नोव्हेंबर रोजी दीपावलीचे अभ्यंग स्नान अर्थात नरक चतुर्दशी आहे. त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील आहे. 14 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा आणि 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आली आहे.
तुलसी विवाह आणि नवीन वर्ष
दिवाळी संपली की 23 नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी एकादशी आहे. त्यावेळी चातुर्मास समाप्ती होईल. यानंतर तुलसी विवाहास प्रारंभ होऊन लग्न समारंभांना सुरुवात केली जाईल. 26 नोव्हेंबर रोजी लगेच त्रिपुरी पौर्णिमा आली आहे. यानंतर 27 नोव्हेंबर रोजी तुलसी विवाह समाप्ती असेल. यानंतर पुढे कोळंबलेल्या सर्व शुभकार्यांना सुरुवात होईल. की लगेच डिसेंबर महिना येईल. 25 डिसेंबर रोजी दत्तजयंती असेल. त्यानंतर तर 2023 वर्ष संपून 2024 चे आगमन होईल.