आरोग्य मंत्र्यावर अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने झाडल्या गोळ्या; प्रकृती चिंताजनक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. एका अज्ञात पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याची घटना झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथे आज घडली. गोळ्या झाडल्यानंतर नाबा खाली कोसळले. जखमी अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास हे झारसुगुडा येथील आमदार आहेत. ते आज दुपारी 12 वाजता मतदारसंघातील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी ब्रजराजनगरातील गांधी चौकात त्यांच्या छातीवर गोळ्या घातल्या. त्यामुळे नाबा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.

https://twitter.com/ANI/status/1619606018660659200?s=20&t=LHKS4nwgVm75mS9Z1ZlKAA

नाबा यांच्यावर ज्या पोलिसाने गोळीबार केला. त्याची ओळख पटली आहे. गोपाल दास अस या हल्लेखोराच नाव आहे. गोदा चौकात एएसआय म्हणून तैनात होता. गोपाल दासने नाबा यांच्यावर 4 ते 5 राऊंड गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. गोळीबार हल्लेखोराला पकडण्यात आले असून गोपाल दास असे त्याचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.