मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार निलंबनाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आता सर्वकाही अनलॉक होत असताना कोरोनाचा धोका अधिक वाढू नये तसेच लोकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आपल्या जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे. मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा टास्क फोर्स समितीची बैठक जिल्हाधिकरी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील लसीकरणाचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना केल्या.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या भागामध्ये लसीकरण कमी आहे अशा भागांमध्ये तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवक,बीडीओ तसेच आरोग्य अधिकारी यांनी सकाळी दहाच्या आधी व सायंकाळी सहा नंतर प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. तसेच तेथील लोकांचे लासीकरणासंबंधी प्रबोधन करावे. बाजाराच्या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक जमतात त्यामुळे बाजाराच्या ठिकाणी  देखील लसीकरण केंद्र उभारावेत. लसीकरणाला गती देण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज ओळखून शहरामध्ये आवश्यक त्या ठिकाणी ऐच्छिक ‘आशा कर्मचारी’ नेमावेत. आरोग्य कर्मचारी वेळेवर कामास उपस्थतीत नसेल अथवा अधिकरी कर्मचारी त्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसतील तर त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले. तसेच लोकांना हव्या त्या वेळेत लसीकरण करता यावे यासाठी लवकरात लवकर घाटी येथे तळमजल्यावर मानसोपचार वॉर्डजवळ तसेच  जिल्हा रुग्णालय चिकलठाणा येथे अशा दोन ठिकाणी २४ तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

लसीकरणासंदर्भात लोकांचे प्रोबोधन व्हावे यासाठी सर्व डॉक्टरांना रुग्णांचे vaccination certificate तपासणे बंधनकारक करण्यात येणार असून लसीकरण न केलेल्या रुग्णाला लसीकरणाचे महत्व समजून सांगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटाने यांनी सर्वांना झोकून देऊन लसीकरणाचे  काम करण्याच्या सूचना करत लसीकरण पूर्ण करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले. पोलीस उपअधीक्षक बनसोड यांनी लसीकरणाची वाढलेली वेळ लक्षात घेता रात्रीच्या वेळी तसेच आवश्यकता असलेल्या प्रत्येक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी पोलीस सुरक्षा देण्यात येईल असे सांगितले.

Leave a Comment