औरंगाबाद – संपात भाग न घेता काम करणारे एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून संपकरी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली गांधीगिरी पाच जणांना चांगलीच भोवली आहे. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई काल करण्यात आली.
मंगळवारी संपा दरम्यान सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांच्या बस मध्ये जाऊन संपकऱ्यांनी सत्कार केला. अधिकाऱ्यांनी हटकल्याने संपकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाही पुष्पहार घातला. यानंतर सिडको बस स्थानकातील पाच कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांना हार घातल्याने जी कारवाई केल्याचा आरोप करून संपकरी कर्मचाऱ्यांना संताप व्यक्त केला.
गांधीगिरीचा हा प्रकार प्रवाह अधिकाऱ्यांनी या संदर्भात संपकाळ यांना जाब विचारला तेव्हा हे अधिकारीही कर्मचारीच आहेत, असे समजून एका संपकरी कर्मचाऱ्यांना त्यांना पुष्पहार घातला. त्यानंतर सायंकाळी अचानक सिडको बस स्थानकातील पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यात अधिकाऱ्यांना पुष्पहार घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यावर संपकरी कर्मचाऱ्यांना संताप व्यक्त केला. ते म्हणाले इतर कर्मचाऱ्यांचा काहीही संबंध नसताना निलंबन करण्यात आले शिवाय शांततेच्या मार्गाने आम्ही कामावरील कर्मचाऱ्यांचा सत्कार करत होतो. गैरसमजातून अधिकाऱ्यांना पुष्पहार घातला गेला.