सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
साताऱ्यातील मिलिटरी अपशिंगे या गावात नुकताच मिलिटरी येथून एक रणगाडा देण्यात आला आहे. भारतीय सेनेच्या मार्फत रक्षा मंत्रालया कडून देण्यात आलेल्या रणगाड्याला पाहण्यासाठी सध्या परिसरातील गावातील लोक भेट देत आहेत. दरम्यान महाराष्ट्र राज्य सैनिक फेडरेशन उद्योग विभागाचे अध्यक्ष समाधान निकम यांच्यासह जिल्हा सैनिक फेडरेशनच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट दिली.
यावेळी वाई -खंडाळा- महाबळेश्वर प्रभारी विजयराव जमदाडे, उपाध्यक्ष सचिन पोळ, सचिव लक्ष्मण पोळ, खजिनदार नीलेश पाबंरे, प्रवक्ता सचिन येवले, सदस्य सचिन ओझर्डेकर, आजी सैनिक रणजित जगताप, गिरीश डेरे, महिला अध्यक्ष मनीषा पोळ, महिला उपाध्यक्ष स्मिताराणी घाडगे, वीरनारी रेश्मा ढवळे, सैनिक फेडरेशन सदस्य विनोद पोळ यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मिलिटरी अपशिंगे गावातील रणगाड्यास भेट देण्यात आली. तसेच गावातील जेष्ठ सेवानिवृत्त सैनिकांकडून गावच्या इतिहासाची माहिती घेतली. यावेळी गावच्या सरपंचाच्या वतीने जिल्हा सैनिक फेडरेशनच्या तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सैन्यात असणाऱ्या मिलिटरी अपशिंगे गावाचा सैनिकांचा मोठा इतिहास आहे. सातारा जिल्ह्यापासून १८ किमी अंतरावर असणाऱ्या या गावात आजही प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती सैन्यात आहे.