हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील आघाडीची कंपनी असलेली OLA इलेक्ट्रिक चा IPO सबस्क्रिप्शनसाठी (Ola Electric IPO) लवकरच खुला होणार आहे. कंपनीने या IPO च्या प्राईज बँडसह इतर महत्त्वाचे डिटेल्स समोर आणलेत. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओ साठी बोली लावण्यात येणार असून या आयपीओचा प्राईज बँड 72-76 रुपये प्रति शेअर असेल तर IPO चा फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी सुमारे ६ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.
Ola Electric IPO चा प्राइस बँड 72 ते 76 रुपये निश्चित करण्यात आला असून या प्राइस बँडनुसार कंपनीचे मूल्यांकन ३३,५२२ कोटी रुपये असल्याचे दिसत आहे. या IPO मध्ये 5,500 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला जाईल. तर ८.४९ कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) असतील. अँकर गुंतवणूकदार 1 ऑगस्ट 2024 रोजी IPO मध्ये बोली लावू शकतात. कंपनीने IPO चा लॉट साइज १९५ शेअर्सवर निश्चित केला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला किमान 195 इक्विटी शेअर्स घ्यावी लागतील. एकूणच काय तर तुम्हाला कमीत कमी एका लॉटसाठी 14,820 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ही पहिली भारतीय इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे जिचा IPO येत आहे.
ओला इलेक्ट्रिक IPO मध्ये काही भाग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल. या अंतर्गत 5.5 कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. इश्यूमधील सुमारे 75 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी म्हणजे QIB साठी राखीव असतील. 15% हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी म्हणजे NII साठी राखीव असेल आणि उर्वरित 10% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
पहा संपूर्ण माहिती ? Ola Electric IPO
प्राइस बँड: 72 – 76 रुपये प्रति शेअर
लॉट साइज: 195 इक्विटी शेअर्स
IPO ओपन कधी होणार : 2 ऑगस्ट 2024
IPO बंद कधी होणार : 6 ऑगस्ट 2024
IPO चा फेस व्हॅल्यू : 10 रुपये