Ola S1 Air : Ola ची सर्वात स्वस्त Electric Scooter लॉन्च; पहा वैशिष्ठ्ये आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या मुहूर्तावर, प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी Ola Electric ने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही गाडी कंपनीची आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत कंपनीने या स्कुटर वर काही ऑफर देखील ठेवल्या आहेत. आज आपण जाणून घेऊया या गाडीची खास वैशिठ्ये ….

वैशिष्ठ्ये – (Ola S1 Air)

Ola S1 Air मध्ये S1 Pro सारखाच सात इंचाचा TFT डिस्प्ले आहे. यात रिव्हर्स बटण, हिल-होल्ड कार्यक्षमता, मल्टीपल प्रोफाइल सेट अप आणि प्रॉक्सिमिटी अलर्ट सारखी वैशिष्ट्ये देखील मिळतात. Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरचे वजन 99 kg आहे, ही गाडी S1 Pro पेक्षा 25 kg हलकी आहे.

Ola S1 Air

85 किमी टॉप स्पीड-

या स्कुटरमध्ये 4.5kW हब मोटर, 2.5kWh बॅटरी पॅक मिळतो. यामुळे ही ई-स्कूटर 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग पकडू शकते. S1 एअरचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास आहे आणि इको मोडमध्ये 100 किमी रेंजचा दावा केला जात आहे. ही स्कूटर 15 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल. याशिवाय लॉकिंग आणि अनलॉकिंगसाठी ऍडव्हान्स फीचर्स या नवीन मॉडेलमध्ये उपलब्ध असतील.

Ola S1 Air

किंमत –

S1 च्या या नवीन मॉडेलची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, २४ ऑक्टोबरपर्यंत बुकिंग करणाऱ्यांना काही सवलत दिली जाणार आहे. दिवाळी ऑफर अंतर्गत (२४ ऑक्टो पर्यंत) बुक करणार्‍या ग्राहकांना ही स्कुटर ७९,९९९ रुपयांच्या किमतीत मिळेल. तुम्ही ९९९ मध्ये ही स्कुटर बुक करू शकता. मात्र यासाठी पुढील वर्षी एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ही स्कुटर निओ मिंट, जेट ब्लॅक, कोरल ग्लॅम, पोर्सिलेन व्हाइट आणि लिक्विड सिल्व्हर या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे .

हे पण वाचा :

Keeway SR125 : दिवाळीपूर्वी लॉन्च झाली ही दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

iVOOMi JeetX Electric Scooter : Ola ला टक्कर देणार ही दमदार स्कुटर; 200 किमीचे मायलेज

Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग