Friday, June 2, 2023

जुना बीड बायपास आजपासून घेणार मोकळा श्वास

औरंगाबाद – सोलापूर ते औरंगाबाद मार्गे धुळे एनएच 211 अंतर्गत शहराबाहेरून जाणारा महामार्ग आजपासून सर्व स्तराच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. वाहतुकीची कुठलीही कोंडी नसणारा महामार्ग अप्रतिम प्रवासाचा अनुभव देणारा ठरणार आहे. मागील तीन वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू होते. ते पूर्ण झाल्यानंतर चाचणीसाठी मागील पंधरा दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला होता. आज पासून हा महामार्ग औपचारिकरित्या खुला होत असल्याचे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी सांगितले आहे.

सातारा-देवळाई, कांचनवाडी, तिसगावलगत हा महामार्ग जात असून बीड बायपास वरील जड वाहतूक आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. 21 डिसेंबर रोजी पूर्णत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर टोल दर निश्चित करण्यात आला आहे. या 30 किमीच्या अंतरात एक पूल आहे, दहा ठिकाणी सर्विस रोड आहेत, आठ अंडरपास आहे, 4 पादचारी मार्ग, जनावरांसाठी एक मार्ग आणि दोन जंक्शन से अंतरात आहेत त्या अंतरात कुठेही रेल्वे ओव्हर ब्रिज मात्र नाही.

बीड बायपासवरील वाहतूक होणार कमी –
या नवीन महामार्गामुळे शहरातील जुन्या बीड बायपास वरील वाहतूक कमी होणार आहे. 30 किमीच्या अंतरात जड वाहतूक धावत असल्यामुळे बीड बायपासवरील जड वाहने आता मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. येणाऱ्या काळात हे प्रमाण आणखी वाढणार आहे.