हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सुरु असलेल्या तपासाला NCB कडून चांगलाच वेग आला आहे=. या चौकशी दरम्यान दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अलीकडेच एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला हैद्राबादमधून अटक केली होती. त्यानंतर त्याच्या कूक आणि हाऊस हेल्परला पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील पुन्हा एकदा चौकशी सुरु आहेत. या चौकशीदरम्यान तिने सुशांतची बहीण व तिचा पती यांच्यासह सारा अली खानबाबत देखील मोठा खुलासा केला आहे. साराने तिला गांजा ऑफर केला होता असे तिने सांगितले आहे. इतकेच नव्हे तर गांजाच्या हँगओव्हरमधून बाहेर कसे पडायचे याबाबतही तिने रियाला माहिती दिली होती.
Sushant Singh Rajput case, Rhea Chakraborty made serious allegations against Sara Ali Khanhttps://t.co/oEOQ0eYWnx
©️RN NEWS WORLD#RheaChakraborty#SushantSinghRajput#SaraAliKhan #BreakingNews#bollywood #Entertainment
Disha Salian— rnnewsworld (@rnnewsworld) June 8, 2021
झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, रियाने NCBच्या चौकशीत सांगितले की, सारा रोल करून गांजाची सिगारेट तयार करायची. तिने मला देखील ही सिगारेट ऑफर केली होती. ६ जून २०१७ मध्ये साराने तिच्या घरी मला वोडका आणि गांजा ऑफर केला होता. शिवाय या अंमली पदार्थांची नशा चढल्यावर त्यातून बाहेर कसे पडायचे याचा उपाय देखील सांगितला होता. इतकेच नव्हे तर रियाने या संदर्भातील काही व्हॉटसअप चॅट देखील दाखवले आहेत. रियाने दिलेल्या या स्टेटमेंटनंतर आता साराची चौकशी केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
https://www.instagram.com/p/CPpw17_pJJq/?utm_source=ig_web_copy_link
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या भावावर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला अमली पदार्थ घेण्यासाठी प्रवृत्त करणे व सवय लावण्याबाबत आरोप लावण्यात आले आहेत. यानंतर तिला वारंवार चौकशीसाठी उपस्थित राहावे लागते. दरम्यान तिला अटकही करण्यात आली होती. मात्र आता कुठे ती आपले आयुष्य पुन्हा एका नव्या उम्मीदीने जगण्याचा प्रयत्न करत आहे. नुकत्याच झालेल्या NCB च्या चौकशीत तिने असे काही खुलासे केले आहेत, कि ज्यामुळे सुशांतच्या केसला एक अलग वळण आले आहे. यात तिने सुशांतच्या बहिणीचे व तिच्या पतीचेही नाव घेतले आहे, त्यामुळे त्यांची देखील लवकरात लवकर चौकशी केली जाण्याची दाट शक्यता आहे.