ओमायक्रोनचा इनफेक्शन रेट डेल्टा व्हेरिऐशनपेक्षा जास्त : डाॅ. भारती पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक नियमावली सूचना दिलेल्या आहेत. केंद्र सरकारने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. या अोमायक्राॅनची इनफेक्शन होण्याचा रेट डेल्टा व्हेरिऐशनपेक्षा जास्त आहे. सिरीयस जास्त नसला तरी इनफेक्शनचा प्रमाण जास्त असल्याचे नियमामध्ये सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने राज्य सरकारांना गाईडलाईन देत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी

कराड येथील कृष्णा रुग्णालयाला व कृष्णा मेडिकल सायन्सेस युनिव्हर्सिटीला भेट दिली. त्यावेळी त्या माध्यमाशी बोलत होत्या. यावेळी डाॅ. सुरेश भोसले, डाॅ. अतुल भोसले उपस्थित होते. पुढे भारती पवार म्हणाल्या, ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काही राज्यातील काही जिल्ह्याचा पॉझीटीव्हीटी रेट 10% पेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकार पथक पाठवून अभ्यास आणि उपाय योजना करत आहे. केंद्र सरकारचे सर्व ठिकाणी लक्ष असते. केवळ कोरोना नव्हेच तर डेंगू, मलेरिया यावरही आरोग्य विभागाचे लक्ष आहे.

कृष्णा इन्स्टिट्यूटने खूप चांगले काम : डाॅ. भारती पवार

कराड मधील कृष्णा इन्स्टिट्यूटने कोरोनाच्या काळात अत्यंत चांगले काम केले. कृष्णा हाॅस्पीटलने आपला परिवार असल्या प्रमाणे लोकांची सेवा केली. जवळपास 8 हजार 500 पेक्षा जास्त कोरोना रूग्णांची काळजी घेतली. सरकारी हाॅस्पीटल कमी पडू लागली तेव्हा पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर खासगी हाॅस्पीटलांनी मदत केली. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून कोव्हीड आणि नाॅन कोव्हिडमधील रूग्णांना सेवा दिली. यामध्ये कृष्णा इन्स्टिट्यूटने खूप चांगले काम केले.

Leave a Comment