औरंगाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद दौऱ्यात मराठवाड्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली. तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी योजनांचा पाढा वाचवून दाखवत मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचं नसतं, अशा कानपिचक्याही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावल्या.
मुख्यमंत्र्यांनी कोणकोणत्या घोषणा केल्या?
– मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा
– निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार
– औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन
– औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना
– मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार
– घृष्णेश्वर सभामंडप
– औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार
– परभणीत शासकीय महाविद्यालय