औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सोमवारपासून दिवाळीनिमित्त विविध मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. यानुसार औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकातून पुणे मार्गावर 22 तर नागपूर मार्गावर चार जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. सर्व बसेसना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
दिवाळीनिमित्त मूळ गावी जाणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी असते. ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोमवार पासून विविध मार्गावर जादा बस सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले होते. यानुसार औरंगाबाद विभागातून पुणे मार्गावर दररोज 15 ते 18 नियमित बस गाड्या धावतात. सोमवारी पहिल्याच दिवशी या गाड्या व्यतिरिक्त तब्बल 22 जादा बसेस सोडाव्या लागल्या तर नागपूर मार्गावर 4 अधिकच्या जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल अहिरे यांनी दिली आहे.
तसेच सिडको बस स्थानकातून अकोला, नांदेड, परभणी, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद या मार्गावरही प्रवाशांची गर्दी पाहून ज्यादा बसेस सोडल्या जात आहेत. दरम्यान दिवाळी सुरू झाल्याने प्रवाशांची संख्या आणखी वा