कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वर पंचायत समिती सभापती संजूबाबा गायकवाड यांनी आपल्या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच तालुक्यात पायाला भिंगरी बांधून काम सुरु केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासह कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी, याकरिता संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन जनजागृती करताना दिसत आहेत.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत नाही लस पुर्णतः सुरक्षित आणि फायदेशीर आहे. कोरोना लसी संदर्भात नागरिकांनी गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन देखील संजूबाबा गायकवाड नागरिकांना करीत आहेत. गावातील कोरोना प्रतिबंधक ग्रामस्तरीय दक्षता समिती यांनी गावाची संपूर्ण काळजी घ्यावी. आशा सेविका यांनी गावातील सर्व नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करून त्यांचे ऑक्सिजन लेवल तपासावी अशा सूचना संजूबाबा गायकवाड यांनी केल्या आहेत.
तसेच प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेट देऊन याबाबतची माहिती ते घेत आहेत. तर, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावागावांमध्ये ऑनलाईन पद्धतीने बैठकांदेखील ते घेत आहेत. मागील वर्षी ”मूठभर तांदूळ गोरगरीब कुटुंबासाठी” ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबवली होती. या संकल्पनेतून तालुक्यातील गोरगरीब, मोलमजूरी करणारे व हातावर पोट असणा-या कुटुंबाची व्यवस्था या माध्यमातून केली होती. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंचे किट देखील वाटण्याचे काम संजुबाबा गायकवाड यांनी केले होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा