औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकी, फार्मसीसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह बी.ए, बीएस्सी व बीकॉमच्या १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बी.ए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा सात एप्रिलपासून सुरळीतपणे सुरु झाल्या आहेत. परांपरागत पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्चपासून तर ६ एप्रिलपासून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत.
कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहेत. परीक्षा केंद्रावर ‘कोविंड संदर्भात योग्य ती उपाययोजना‘ व फिजीकल डिस्टिन्सिंग ठेऊन परीक्षा घेण्याची सूचना कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिल्या आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या १४ हजार ९४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १६ मार्चपासून सुरु झालेल्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेस १ लाख २७ हजार १८७ परीक्षार्थी आहेत. तर ७ एप्रिल रोजी सुरु झालेल्या बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाच्या परीक्षेस एकुण ७६ हजार ४९० विद्यार्थी आहेत. यामध्ये बी.ए चे ३० हजार ७९१, बी.एस्सीचे २९ हजार ५०० व बी.कॉमचे १६ हजार १९९ विद्यार्थी आहेत.
पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरु होऊन तीन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. या काळात विविध अभ्यासक्रमांचे २ लाख १८ हजार ६२० विद्यार्थी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा देत आहेत. २५० महाविद्यालये होम सेंटर आहेत. मंगळवारी १ लाख ३६ हजार ६५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर बुधवारी एकूण १ लाख ७० हजार ३७५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने परीक्षा दिली. या मध्ये १ लाख २५ हजार ७३० जणांनी ऑफलाईन पध्दतीने २५० केंद्रांवर परीक्षा दिली. तर ४४ हजार ६४५ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. या दोन दिवसात मिळून ३ लाख ६ हजार ९३४ जणांनी परीक्षा दिली, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी दिली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou