सिनेप्रेमींसाठी खुशखबर!! ‘या’ दिवशी पाहता येणार फक्त 99 रुपयात सिनेमा

Cinema
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला सर्वांनाच आवडते. परंतु याच सिनेमा थेटरचे तिकीट महाग असल्यामुळे प्रत्येकालाच ते परवडत नाही. मात्र आता सिनेमा लव्हर्स डे निमित्त सर्वांनाच फक्त 99 रुपयांमध्ये थेटरमध्ये जाऊन सिनेमा पाहता येणार आहे. पीव्हीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX) ने सिनेप्रेमींसाठी ही खास ऑफर आणली आहे. त्यामुळे आता स्वस्तामध्ये प्रेक्षकांना थेट थेटरात जाऊन पिक्चर पाहता येणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स असणाऱ्या PVR-INOX ने सिनेप्रेमींसाठी ही नवीन ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत सिनेमा प्रेमींना फक्त 99 रुपयांमध्ये सिनेमा हॉलमध्ये जाऊन आवडता सिनेमा पाहता येणार आहे. खास म्हणजे, PVR-INOX ने ही ऑफर ‘सिनेमा लव्हर्स डे’च्या निमित्ताने जाहीर केली आहे. मात्र ही ऑफर फक्त येत्या शुक्रवारपर्यंत सुरु असेल.

महत्वाचे म्हणजे, 99 रुपयांच्या या ऑफर अंतर्गत नुकतेच प्रदर्शित होणारे ‘क्रॅक’,’आर्टिकल 370′ आणि ‘ऑल इंडिया रँक’ सिनेमे पाहता येणार आहेत. तसेच, ‘तेरी बातों में ऐसा लझा जिया’, ‘फायटर’, ‘कुछ खट्टा हो जाए’ अशा सिनेमांसाठी देखील ही ऑफर लागू असेल. याबरोबर, ‘मॅडम वेब’, ‘द होल्डओवर्स’, ‘बॉब मार्ले-वन लव’ आणि ‘मीन गर्ल्स’,’द टीचर्स लॉन्ज’ असे सर्व सिनेमे फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येतील.

दरम्यान, PVR आणि INOX ने प्रीमियम फॉरमॅटसाठी देखील एक उत्तम ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत, फक्त 199
रुपयांमध्ये रिक्लिनर सीटवर बसून आवडता चित्रपट पाहता येणार आहे. ज्यांना IMAX, 4DX, MX4D आणि गोल्ड श्रेणीतील चित्रपटांचा आनंद घ्यायचा असेल त्यांच्यासाठी देखील सवलतीच्या दरातमध्ये तिकिटे उपलब्ध असतील.