Monday, February 6, 2023

पुन्हा एकदा 9 दुचाकीसह एक कार लंपास; वाहनचोरी रोखण्यात पोलीस यंत्रणा अयशस्वी

- Advertisement -

औरंगाबाद | गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. ही वाहनचोरी रोखण्यात पोलिस यंत्रणा अपयशी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात चोरट्यांनी 9 दुचाकी वाहने पळविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे.

या प्रकरणी संबधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. युनूस शब्बीर खान पठाण (रा. चौकावाडी) यांची दुचाकी (एम एच 20 सी ए 6875) सिटीचौक परिसरातून चोरट्यांनी 24 जून रोजी रात्री पळवली. बंजारा कॉलनीतील प्रकाशचंद भवरलालजी बाटींया जैन यांच्या घरासमोरून चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 20 बी 1625) लंपास केली. दिलीप भीमराव काळे यांनी उस्मानपुऱ्यातील रेल्वे पोस्ट कार्य जवळ उभी केलेली मोटर सायकल (एम एच 20 एके 3550)चोरट्यांनी पळवली गारखेडा येथील रिलायन्स मॉल एका महिलेची(एम एच 20 सी क्यू 6525) चोरट्यांनी चोरून नेली.

- Advertisement -

मध्यवर्ती बस स्थानकासमोर शुभम रावसाहेब काळे (रा. पडेगाव) यांची दुचाकी ( एम एच 20 बी व्ही 0240)चोरीस गेली रुग्णालयाच्या गेटसमोर चोरट्यांनी संजय सोनाजी रगडे यांचे मोटरसायकल(एम एच 20 डी एक्स 1438)पळवली चोरट्यांनी पळवली. दुचाकी सोबत चारचाकी वाहनेही पळवले जात आहेत. वैजापूर मधील शेख राजू शेख बाबुलाल यांची कार घाटी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून चोरीस गेली आहे.