सहकार पॅनल अकरा जागांवर आघाडीवर : काले -कार्वे गटातून दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात यांना 5 हजाराहून अधिक मतांची आघाडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या सर्वसाधारण उत्पादक गटातील काले -कार्वे गटातून तिन्ही जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या दयानंद पाटील, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात यांनी 5 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत काले- कार्वे गटातून पहिल्या फेरीतील मते जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 17 हजार 292 मतापैकी 16 हजार 887 मध्ये वैद्य ठरली आहेत. तर 405 मते अवैद्य ठरलेली आहेत.

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल दयानंद भीमराव पाटील (काले) 10 हजार 74, गुणवंतराव यशवंतराव पाटील (आटके) 9 हजार 699, निवासराव लक्ष्मण थोरात (कार्वे) 9 हजार 641, संस्थापक पॅनेल पांडुरंग यशवंत पाटील (काले) 4 हजार 405, जयसिंग पाटील (आटके) 4 हजार 257, सुजित पतंगराव थोरात (कार्वे) 4 हजार 174, रयत पॅनेल अजित विश्वास पाटील (काले) 2 हजार 69, सयाजीराव यशवंतराव पाटील (आटके) 2 हजार 132, दत्तात्रय भगवान थोरात (कार्वे) 2 हजार 101 तर अपक्ष धनराज पाटील यांना 37 अशी मते असून अद्याप दुसरी फेरीची मतमोजणी बाकी आहे.

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलच्या सर्वसाधारण उत्पादक गटातील वडगाव हवेली- दुशेरे येथून तिन्ही जागांवर पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. सहकार पॅनेलच्या धोंडीराम जाधव, सयाजी यादव, जगदीश जगताप यांनी 5 हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणीत सर्वसाधारण उत्पादक गटातून पहिल्या फेरीतील मते जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण 17 हजार 290 मतापैकी 16 हजार 959 मध्ये वैद्य ठरली आहेत. तर 321 मते अवैद्य ठरलेली आहेत.

पहिल्या फेरीत फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे सहकार पॅनेल जगदीश दिनकरराव जगताप (वडगाव हवेली) 9 हजार 732 धोंडीराम शंकरराव जाधव (दुशेरे) 9 हजार 962, सयाजी रतन यादव 9 हजार 574, संस्थापक पॅनेल अशोक मारुती जगताप (वडगाव हवेली) 4 हजार 645, उत्तम तुकाराम पाटील (दुशेरे) 4 हजार 177, सर्जेराव रघुनाथ लोकरे (येरवळे) 4 हजार 435, रयत पॅनेल सुधीर शंकरराव जगताप (वडगाव हवेली) 2 हजार 264, बापूसाहेब भानुदास मोरे (कोडोली) 2 हजार 117, सुभाष रघुनाथ पाटील (येरवळे) 2 हजार 113 अशी मते असून अद्याप दुसरी फेरीची मतमोजणी बाकी आहे.

Leave a Comment