जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी15 हजारांची लाच घेताना आर.पी.आय शहर अध्यक्षासह एकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या समाज कल्याण कार्यालयात वशिला लावून जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे अमिश दाखवून १५ हजारांची लाच घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह एकास अटक केली. अरुण बबन आठवले आणि प्रज्ञावंत गणपती चवडीकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे यातील आठवले हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. लाच लुचपत विभागाने केलेल्या या धडक कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

तक्रारदार यांनी सांगलीतील समाज कल्याण विभागात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. सदरचे प्रमाणपत्र हे लवकर मिळवून देतो, माझे खूप वजन आहे. वरिष्ठ अधिकारी माझे ऐकतात असे म्हणत आरपीआयचा शहर अध्यक्ष अरुण आठवले आणि प्रज्ञावंत चवडीकर या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यासाठी १५ हजार व स्वतःसाठी पाच हजार अशी एकूण २० हजार रुपयांची मागणी दोघांनी केली होती. त्यापैकी १५ हजार रुपये हे चवडीकर यांच्याकडे देण्यास आठवले याने सांगितले होते.

तक्रारदार यांनी मंगळवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी लाच लुचपत विभागाकडे तक्रारी अर्ज केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पडताळणी केली असता दोघांनी लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने कॉलेज कॉर्नर येथे सापळा लावला असता चवडीकर याला १५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.

Leave a Comment