नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्यासोबत फिरण्याच्या कारणावरून एकास मारहाण, तिघांवर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नगरसेवक इंद्रजित गुजर यांच्या सोबत फिरत असल्याच्या कारणावरून एकास तिघांनी संगनमत करून डोक्यात खुर्ची घालून मारहाण केल्याची घटना आहेर कॉलेज बनवडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुशांत जगताप असे मारहाण झालेल्याचे नांव आहे.

याबाबतची फिर्याद सुशांत देवानंद जगताप (वय 21, रा. विठ्ठलनगर मार्केटयार्ड, शनिवार पेठ, कराड) याने शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महेश पाटील, ऋतुराज मोरे, विक्रम शिंगण (सर्व रा. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत. सदरचा प्रकार गुरूवारी रात्री 9 च्या सुमारास झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सुशांत जगताप हा इंद्रजित गुजर यांच्यासोबत फिरत असल्याच्या कारणावरून चिडून जाऊन तिघांनी आपसात संगनमत करून बुधवारी रात्रीच्या सुमारास आहेर कॉलेज बनवडी येथे सुशांतला गाडीतून खाली ओढून शिवीगाळ करत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इंद्रजित गुजर यांस घराबाहेर काढण्यासाठी सुशांत याला घेऊन पुढे गेले त्यावेळी विक्रम शिंगण याने सुशांतच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची घालून त्यास जखमी केले. याबाबत सुशांत जगताप याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक कोळी करत आहेत.

Leave a Comment