One Day Cricket : क्रिकेट हा खेळ जगातील अनेक देशांमध्ये खेळला जातो. यामध्ये त दिवसांचा कसोटी सामना, ५० षटकांचा एकदिवसीय सामना आणि २० ओव्हरची T २० मॅच असे ३ फॉरमॅट आहेत. बदलत्या जगानुसार आजकल T २० मॅचला प्रेक्षकांची जास्त पसंती पाहायला मिळते तर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट पाहणे प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटते. त्यामुळे अलीकडच्या काळात वन डे आणि कसोटी सामन्याला प्रेक्षकवर्ग पाठ फिरवत आहे. यामुळे यावर उपाय काढण्यासाठी इथून पुढे एकदिवसीय क्रिकेट मॅच ४० ओव्हरची करा म्हणजे सामना रोमांचक होईल आणि प्रेक्षक सुद्धा मोठ्या उत्साहाने पाहतील असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲरॉन फिंचने दिला आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोसाठी एका व्हिडिओमध्ये फिंच म्हणाला, एकदिवसीय सामन्यांत ४० ओव्हरची मॅच करा कारण ५० षटकांचा खेळ खूप धीमा वाटतं आहे. वनडे क्रिकेट सामना जर ४० ओव्हरचा केला तर तो पाहायला सुद्धा चांगलं वाटेल. यापूर्वी इंग्लंडमध्ये प्रो-40 सिरीज खेळवण्यात येत होती जी एक मोठी स्पर्धा होती. एकदिवसीय क्रिकेट (One Day Cricket) सामना ११ किंवा १२ तास चालतात. हे मान्य नाही. लोक म्हणतील की T20 मुळे वनडे क्रिकेट संथ वाटतं आहे पण असं काही नाही असं मत ॲरॉन फिंचने व्यक्त केलं.
यापूर्वी सचिनने केली होती मागणी – One Day Cricket
एकदिवसीय क्रिकेट जास्त रोमहर्षक व्हावे यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने काही वर्षांपूर्वीच उपाय सांगितला होता. सचिनच्या मते वनडे साठी ५० षटकांच्या ऐवजी २५ षटकांचे प्रत्येकी २ डाव खेळवण्यात यावे, म्हणजेच कसोटीप्रमाणे इथेही दोनदा बॅटिंगची संधी मिळेल आणि ओव्हर्स कमी असल्याने चौकार षटकारांचा पाऊस पडले आणि रोमांचक मुकाबला होईल. सचिन शिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमनेही एकदिवसीय क्रिकेट सामन्यात षटकांची संख्या कमी केली पाहिजे, असे म्हटले होते.