One Day Trip Spots : पावसाळ्यात वन डे ट्रीपसाठी ‘ही’ ठिकाणं एकदम बेस्ट; जाल तर म्हणाल WOW

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (One Day Trip Spots) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून सगळीकडे निसर्गाने हिरवाईची चादर ओढली आहे. पावसाच्या दिवसात निसर्गाचा एक वेगळच अवतार पहायला मिळतो. जो सगळ्यांनाच आवडतो. मनाला सुखावणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत हिरवाईने नटलेला निसर्ग, धुक्याची शुभ्र चादर अन त्यासोबत चिंब झालेले डोंगर पाहणे आल्हाददायी अनुभव देणारे आहे. त्यामुळे पाऊस सुरु झाला की, कुठेतरी मस्त फिरायला जायचं प्लॅनिंग सुरु होतं. महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पावसाळ्यात आणखीच सुंदर दिसतात आणि त्यांचे हे नैसर्गिक सौंदर्य आपल्याला आकर्षित करतं.

पावसाच्या रिमझिम सरींमध्ये हिरवा शालू पांघरलेला निसर्ग जवळून पाहायचा असेल तर किमान वन डे पिकनिक (One Day Trip Spots) तरी जरूर करा. ज्यामुळे रोजच्या दगदगीतून तुम्हाला थोडीशी शांतता मिळेल आणि मनावरील ताण हलका होईल. बऱ्याचदा ऑफिसमधून सुट्टी काढून फिरायला जाणे जमत नाही. अशावेळी वन डे पिकनिक प्लॅन करणे फायद्याचे ठरते. पण मग एका दिवसात कुठे फिरून यायचं? असा प्रश्न पडतो. याचं उत्तर आज आम्ही देऊ. महाराष्ट्रात अशी बरीच ठिकाणे आहेत जी निसर्गाने समृद्ध असून वन डे पिकनिकसाठी बेस्ट आहेत. चला त्याविषयी जाणून घेऊया.

1. लोणावळा – खंडाळा

Lonavala Khandala

मुंबई पुण्याजवळील लोणावळा आणि खंडाळा ही अत्यंत सुंदर ठिकाणे आहेत. (One Day Trip Spots) निसर्गाने समृद्ध अशी ही ठिकाणे पावसाळ्यात आणखीच सुंदर दिसतात. डोंगर, दऱ्या, हिरवाई, धबधबे पहायचे असतील आणि निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जायचे असेल तर लोणावळा खंडाळाला जरूर जा. इथे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट गाड्यांची किंवा बाईकवरून लॉन्ग ड्राईव्हची मजा घेऊ शकता.

2. माथेरान (One Day Trip Spots)

MATHERAN
MATHERAN

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले माथेरान हे महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. इथे कोणत्याही ऋतूमध्ये फिरायला जायची एक वेगळीच मजा आहे. त्यात जर पावसाळा असेल तर इथला निसर्ग पर्यटकांना फारच आकर्षित करतो. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असणारे हे एक असे डोंगरी शहर आहे जिथले शांत वातावरण आणि निसर्गाचे विहंगम दृश्य मनाला भुरळ घालतात. त्यामुळे सुट्टी मिळत नसेल तर वन डे साठी हा एक बेस्ट पर्याय आहे. इथे तुम्ही टॉय ट्रेनचा प्रवास करून निसर्गाचा आनंद घेऊ शकता. शिवाय नौकाविहार आणि हॉर्स रायडिंगसुद्धा करू शकता.

3. अलिबाग

Alibaug

अलिबाग हे एक असे पर्यटन स्थळ आहे जिथली शांतता तुम्हाला रोजच्या गजबजाटातून क्षणभर विश्रांती देऊ शकतात. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेले अलिबाग इथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठी ओळखले जाते. या ठिकाणी नागाव बीच तसेच अक्षी बीच फिरण्यासारखे आहेत. (One Day Trip Spots) पावसाळ्याच्या दिवसात इथले वॉटर स्पोर्ट्स बंद असले तरीही निसर्ग अगदी पाहण्यासारखा असतो. त्यामुळे या ठिकाणी निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता येईल. शिवाय स्वादिष्ट समुद्री खाद्यपदार्थांची चव घ्यायची असेल तर जवळच्या जवळ अलिबागला हे ठिकाण एकदम बेस्ट.

4. मुंबई- पुणे जुना महामार्ग

Mumbai_ Pune Old Highway

ऑफिसमधून सुट्टी मिळत नसेल पण निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर धावपळीपासून दूर आणि तरीही शहरापासून जवळ अशा मुंबई- पुणे महामार्गावर एक लॉन्ग ड्राइव्ह तो बनती है!! (One Day Trip Spots) बऱ्याच लोकांना निसर्गात रमायला आवडत. यांपैकी एक तुम्ही असाल तर मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर प्रवास करा. पावसाळ्याच्या दिवसात हा महामार्ग प्रवासादरम्यान अनोखा आनंद देतो. या आनंदासाठी मुंबई ते पुणे असा जुन्या महामार्गावरून प्रवास करा. आजूबाजूची दृश्य तुमच्या मनाला प्रचंड आनंद देतील.