कारखान्यात ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू

0
220
Karad Taluka Police Station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | ऊसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. रेठरे बुद्रूक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ही घटना घडली. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. शंकर रामचंद्र डोईफोडे (वय- 40, रा. रेठरे बुद्रूक, ता. कराड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील कृष्णा कारखान्यावर काम करीत असताना ट्रॉलीतून उचललेला ऊसाचा भारा अचानक शंकर डोईफोडे यांच्या अंगावर पडला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.