राजमाचीत मारामारीत एकजण जखमी, तिघांवर गुन्हा

crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

घराचे बांधकाम करण्याच्या कारणावरून राजमाची येथील मारामारी प्रकरणी तिघांवर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमोल मोहन डुबल, रेखा मोहन डुबल, मोहन रामचंद्र डुबल (सर्व रा. राजमाची, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनकर डुबल हे जखमी असून बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाची येथे दिनकर डुबल हे घराचे बांधकाम करत होते. यावेळी तेथे अमोल डुबल, रेखा डुबल, मोहन डुबल आले. त्यांनी शिवीगाळ करीत कोर्टाचा स्टे असल्याने तुम्ही बांधकाम करू नका, असे सांगितले. त्यावर बालाजी डुबल यांनी कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर अमोल डुबल याने तुम्हाला बांधकाम करू देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत हातातील कोयत्याने दिनकर डुबल यांच्या हाताच्या तळव्यावर मारून त्यांना जखमी केले.

त्यानंतर अमोल याने तेथून पळ काढला. दिनकर डुबल यांच्यावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.