One Nation One Gold Rate Policy : संपूर्ण देशात सोन्याचा एकच भाव? काय आहे ‘वन नेशन वन गोल्ड रेट’ धोरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय… आपल्या भारतात सोने खरेदीला मोठं महत्व आहे. त्यामुळे अनेक शुभ मुहूर्ती ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत असतात. मात्र सोन्याचा भाव हा प्रत्येक शहरात वेगवेगळा पाहायला मिळतो. सोन्या-चांदीच्या दरात प्रत्येक राज्याच्या वेगवेगळ्या करांचा आणि धोरणांचा फरक पडतो. परंतु आता संपूर्ण देशात आपल्याला सोन्याचा एकच भाव दिसू शकतो. जेम अँड ज्वेलरी कौन्सिल वन नेशन, वन रेट पॉलिसी (One Nation One Gold Rate Policy) लागू करण्यास तयार आहे.

यासाठी जेम अँड ज्वेलरी कौन्सिल (GJC) ने देशभरातील आघाडीच्या ज्वेलर्सचे मत घेतले आहे. यावेळी संपूर्ण देशात सोन्याची एकच किंमत लागू करण्यावर सर्वांचे एकमत झालं आहे. सप्टेंबरच्या बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी उद्योग सक्रियपणे चर्चा करत आहे.

‘वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी म्हणजे काय? One Nation One Gold Rate Policy

वन नेशन वन गोल्ड रेट धोरण (One Nation One Gold Rate Policy) ही भारत सरकारने प्रस्तावित केलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश हाच आहे कि देशभरातील सोन्याच्या किमती एकसमान व्हाव्यात. याचाच अर्थ, देशाच्या कोणत्याही शहरात तुम्ही गेलात तरी सोन्याची किंमत एक एकसारखीच राहील. ‘वन नेशन वन गोल्ड रेट पॉलिसी या योजनेंतर्गत सरकार राष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करणार आहे. हे एक्सचेंज सोन्याची किंमत ठरवेल आणि ज्वेलर्सना ते याच किमतीत विकावे लागेल. उदाहरणार्थ, शेअर बाजारात, एखाद्या कंपनीच्या शेअर्सची किंमत संपूर्ण देशात सारखीच असते आणि तीच किंमत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड केली जाते. सध्या MCX वर सोने आणि चांदीची खरेदी-विक्री होते. मात्र आता सराफा बाजारासाठीही एक्सचेंज निर्माण केले जाणार आहे. किमतीतील तफावत बंद झाल्यामुळे सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. समान किंमतीमुळे मनमानी दर आकारण्यास वाव राहणार नाही.त्यामुळे सोन्याच्या व्यवहारात पारदर्शकता येईल.