हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या नात्यातील एक छान असा सण आहे. हा नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी रक्षाबंधनचा सण आपल्या देशात साजरा केला जातो. परंतु आपल्या देशात असं एक गाव आहे कि तेथे क्रित्येक वर्ष रक्षाबंधन साजरा केला जात नाही. तेथील बहिणी आपल्या लाडक्या भावाला किती तरी वर्षे राखी बांधत नाही. भिमुखपूर जगतपूर्व असं या गावच नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंडा जिल्ह्यातील जगतपूर्व या गावात अशी अनेक घर आहेत कि तेथे वर्षनुवर्षे रक्षाबंधन साजरा केला जात नाही. या गावात रक्षाबंधन हा सण अपशकुन मनाला जातो. जुन्या काळापासून हि प्रथा तेथे सुरु आहे . या दिवशी काहीतरी चुकीचं घडलं गेले होत या गावात म्हणून कदाचित हा सण साजरा केला जात नाही असं तेथल्या तरुणांनी सांगितलं. त्यामुळे नवीन पायंडा पडला जात नाही. आजूबाजूच्या गावातील बहिणी सुद्धा त्या गावातील मुलांना राखी बांधत नाहीत. त्या गावातील आहे असं सांगताच कोणी फोर्स करत नाही.
त्या गावातील सूर्यनारायण मिश्रा यांनी गावातील परंपरेची माहिती दिली आहे. ते म्हणाले कि, गावात देशाला स्वातंत्र मिल्यानंतर ५ वर्षातच त्यांच्या कुटुंबातील एका भावाचा मृत्यू रक्षाबंधन च्या दिवशी झाला. तेव्हापासून हि परंपरा सुरु झाली आहे. तेव्हापासून आमच्या घरातील बहिणी राखी बांधत नाहीत. आणि भाऊ पण राखी बांधून घेत नाहीत. काही वर्षपूर्वी या गावात एका तरुणाच्या आग्रहाखातर आम्ही रक्षाबंधन चा सण साजरा केला पण त्यादिवशी पण अशीच काहीशी घटना घडली . तेव्हापासून सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्या घटनेपासून गावातील कोणी सुद्धा रक्षाबंधन साजरी करण्याचा हट्ट धरत नाही. आम्हाला पण वाईट वाटत कि आम्ही बहिणींना त्या दिवशी बोलवत नाही इतर ठिकाणी साजरी केली जाते आपल्याकडे नाही असं अनेक वेळा वाटत पण आहे ती परंपरा खंडित करण्याचं धाडस होत नाही. अशी सूर्यनारायण म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.