भोळसर महिलेवर बलात्कार करणाऱ्या तिघांपैकी एकजण गजाआड

rape
rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : शहरातील सिडको परिसरातील एका भोळसर महिलेवर तिघाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानाच्या गॅलरीत झोपी गेलेल्या भोळसर महिलेवर बलात्कार करणाऱ्या तिघा आरोपींपैकी एकाला सिडको पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. आकाश उर्फ टोंग्या भगवान तुपे (20, रा. एन 7 सिडको ) असे आरोपीचे नाव असून त्याला 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी दिले. आरोपी प्रकरणात रमाकांत निषाद (20, राहणार गणेश नगर गारखेडा) याने फिर्याद दिली.

निषाद यांचे एन 7 परिसरात दुकान आहे, त्यांनी दुकानात चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. 27 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानासमोर घाण केलेली दिसली. त्यामुळे त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रस्त्याने येणारी भोळसर महिला त्यांच्या दुकानाच्या गॅलरीत पांघरून घेऊन झोपलेली दिसली.

सव्वा ते दीड वाजेच्या सुमारास एक व्यक्ती तेथे आला व त्याने बलात्कार केला व तेथून निघून गेला. त्यानंतर निषाद यांनी सात दिवसांचे फुटेज तपासले 27 जून रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास देखील विविध दोन व्यक्तींनी भोळसर महिलेवर बलात्कार केल्याचे समोर आले. प्रकरणात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला पोलिसांनी अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.