घारेवाडीत दुचाकी चारचाकीच्या धडकेत एकजण जागीच ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील घारेवाडी येथे भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. सोमवारी घारेवाडी येथे कराड ढेबेवाडी रस्त्यावर स्विफ्ट व दुचाकीचा अपघात झाला. अपघातात आणे, ता. कराड येथील विनोद कांबळे यांचा झाला जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेले विनोद हे कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे कर्मचारी होते.

याबाबात अधिक माहिती अशी की, कराड ढेबेवाडी रस्त्यावर सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घारेवाडी हद्दीत असलेल्या पेट्रोल पंपासमोर स्विफ्ट कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कराड तालुक्यातील आणे येथील विनोद निवृत्ती कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावलेले विनोद कांबळे हे कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे कर्मचारी असल्याने ते सकाळी कामावर निघाले होते. घारेवाडी येथील पेट्रोल पंपासमोर ते आपल्या दुचाकीवरून आले असता त्यांच्या दुचाकीचा व स्विफ्ट कारची धडक झाली.

दोन्ही वाहनांच्या धडकेत कर्मचारी विनोद कांबळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. अत्यंत मनमिळावू असणाऱ्या विनोद कांबळे यांच्या निधनाने कोयना वसाहत ग्रामपंचायतीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आणे गावातही सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोळे पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास कोळे पोलिस करीत आहेत.