ट्रकला दुचाकीची पाठीमागून धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

0
126
Accident News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजीक तळबीड बेलवडे गावच्या हद्दीत आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रोहीत रामचंद्र राऊत (वय 23),रा. शिरगांव, तालुका कराड असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड सातारा लेनवर तळबीड बेलवडे हद्दीत ट्रक चालक बसाप्पा निडगुंडे (वय 53) रा. चिकोर्डी जिल्हा बेळगाव, ट्रक (क्र. MH 12 NX 3254) यांनी आपला ट्रक पॅसेंजर घेण्यासाठी महामार्गाच्या कडेला थांबला होता. त्याच्याकडून पॅसेंजर घेतले जात असताना अचानकपणे पाठीमागून आलेल्या दुचाकी (क्र. MH 50 P 4634) ने ट्रकला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार रोहित राऊत जागीच ठार झाला. तर या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले.

या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे इनचार्ज दस्तगीर आगा, प्रकाश गायकवाड, राजु होवाळ, धनाजी घारे व तळबीड पोलिस स्टेशन चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच अपघाताची माहिती घेत दुचाकीस्वारास दवाखान्यात नेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here