परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, आपल्या मागण्यांसाठी आता अधिक आक्रमक झाल्या असून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी, तसेच या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन लागू करावे.
या आणि इतर मागण्यासाठी संघटना आक्रमक झाली असून, यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मागील अनेक दिवसांपासून, शासन दरबारी या मागण्या ठेवूनही शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी संघटनेने केला आहे. दरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या कारभारावर परिणाम पडला आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”