One School One Uniform | शाळांमध्ये 15 जूनपासून असणार ‘एक राज्य एक गणवेश’; जाणून घ्या नियमावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

One School One Uniform | दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. परंतु जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी यावर्षी नवीन गणवेश विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता राज्यातील पहिली ते आठवीच्या मुलांसाठी एक राज्य एक गणवेश (One School One Uniform) ही योजना लागू करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच्या आदेश देखील सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत.

पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला- मुलींना मोफत गणवेश योजना दिली जाते. आता शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये महिला बचत गटामार्फत शिलाई करून एकसमान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आता हे गणवेश वेगवेगळ्या इयत्तांसाठी मुलांसाठी वेगवेगळे असणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस घालायचा हे देखील ठरवण्यात आलेले आहे. आता याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

इयत्ता पहिली ते चौथी मुली | One School One Uniform

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार, शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हर ऑल फ्रॉक

इयत्ता पाचवी मुली

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाश रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
गडद निळ्या रंगाचा ओव्हरऑल फ्राक

इयत्ता 6 वी ते 8 वी मुली आणि 1 ली ते 8वी मुली (उर्दू माध्यम)

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी निळ्या रंगाची कमिशन या गडद रंगाचा सलवार आणि गडद निळ्या रंगाची ओढणी
स्काऊट गाईड गणवेश – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
गडद आकाशी रंगाची कमीज गळ्यात निळ्या रंगाची सलवार गडद निळ्या रंगाची ओढणी

इयत्ता 1 ली ते 7 वी मुले

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट
स्काऊट आणि गाईड – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि गळत निळ्या रंगाची हाफ पॅन्ट

इयत्ता 8 वी मुले | One School One Uniform

नियमित गणवेश – सोमवार, बुधवार आणि शुक्रवार
आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची फुल पँट
स्काऊट गाईड – मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
स्टील ग्रे रंगाचा हाफ शर्ट आणि काळ्या निळ्या रंगाची फुल पँट

शासनाने दिलेल्या नुसार विद्यार्थ्यांनी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी या दिवशी गणवेश धारण करायचा आहे. आणि स्काऊट गाईड या विषयाचा गणवेश मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी परिधान करायचा आहे. या दिवशी स्काऊट गाईड विषयाच्या तासिका देखील घेण्यात येणार आहे. राज्यातील 15 जून 2024 पासून सर्व शाळा सुरू होत आहे. त्यामुळे महिला बचत गटामार्फत गणवेशाची शिलाई सुरू आहे.