एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

Women Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ठाणे | कॉलेजला चाललेल्या तरुणीवर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाणे येथे घडला आहे. यामधे २२ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हाती आलेल्या माहीतीनुसार, निळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक मुलगा त्या तरुणीच्या गाडी जवळ आला. त्याने अचानक तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. तिच्या शरीरातून तीव्र वेगात रक्त बाहेर पडू लागल्याने तो बैचेन झाला. त्याने गोंधळून त्याच ठिकाणी आपला जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु लोक आजू बाजूला गोळा होऊ लागल्याने त्याने तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला तेथील स्थानिक दोन मुलांनी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे.
मुलगा आणि ती तरुणी एकमेकांच्या ओळखीचे असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शनींनी लावला आहे. सदरील घटना एकतर्फी प्रेमातून घडली असण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. तरुणी ठाणे कॉलेजची विद्यार्थीनी असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.