एकतर्फी प्रेमातून आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत तरुणाने केले ‘हे’ कृत्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एका धक्कादायक घटना घडली. यामध्ये एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका मजनूने त्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. आरोपीने पीडित मुलीकडे माझ्याशीच लग्न असा तगादा लावला होता तसेच माझ्याशी लग्न नाही केले तर तुझ्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देखील त्याने त्या मुलीला दिली होती. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांत गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून करण्यात येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण
आरोपीचे नाव कुतुबुद्दीन हबीब काचवाला असून तो २३ वर्षांचा आहे. तो कसबा पेठ या ठिकाणी राहतो. २०१६ मध्ये आरोपी तरुण आणि पीडित तरुणी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. कुतुबुद्दीन हा तेव्हापासून या तरुणीवर एकतर्फी प्रेम करत होता. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तरुणीने आरोपीसोबत रिलेशन ठेवण्यास नकार दिला होता. पण तरीदेखील आरोपी तिच्याशी एकतर्फी प्रेम करतच राहिला. तसेच त्याने त्या तरुणीला तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलं, तर त्या मुलाला आणि तुझ्या आई वडिलांना जीवे मारेन अशी धमकीसुद्धा दिली होती. एवढेच नाही तर त्या आरोपीने पीडित तरुणीकडून एक सोन्याची साखळी आणि 40 हजार रुपयांची रोकड अशी एकूण 85 हजार रुपयांची खंडणी देखील घेतली होती.

यानंतर तरुणीने सततच्या त्रासाला कंटाळून 21 वर्षीय पीडित तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिने आपल्या तक्रारीत आरोपीनं आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देवून शरीरसुखाची मागणी केल्याचे तिने सांगितले आहे. या प्रकरणी कुतुबुद्दीन हबीब काचवाला याला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट यार्ड पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment