कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
उंडाळे येथील स्वा. सै. शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत रयत साखर कारखान्याचे चेअरमन अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनलने विरोधी चुलते जयसिंगराव पाटील व चुलत बंधू आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील यांच्या शामराव पाटील सहकार पॅनेलचा सर्वच्या सर्व जागावर दारुण पराभव करत सत्ता घेतली.
स्वा. सै. शामराव पाटील नागरिक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक तब्बल 42 वर्षानंतर प्रथमच लागली होती. युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते विलासकाका पाटील रयत पॅनल उभे करण्यात आले होते. तर विरोधी जयसिंगराव पाटील व चुलत बंधू राजाभाऊ पाटील यांनी शामराव पाटील सहकार पॅनल निवडणूकीत होते. शनिवारी अत्यंत चूरशीने मतदान होऊन 8900 पैकी 6140 मतदान झाले होते. आज उंडाळे येथील स्वा. दादा उंडाळकर स्मारक मंदिर येथे मतमोजणी पार पडली. यामध्ये जयसिंगराव पाटील व राजाभाऊ पाटील यांच्या पॅनलला अवघी 1300 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक संदीप जाधव यांनी काम पाहिले.
विजयी- पराभूत उमेदवार व मते पुढील प्रमाणे- सर्वसाधारण कर्जदार गटातून- पाटील बळवंत लक्ष्मण (4,481), घराळ सिद्धनाथ बाळू (4,454), चव्हाण अशोक रघुनाथ (4,442), थोरात सर्जेराव विठ्ठल (4,441), माने आनंदात चंदर (4,431), शेवाळे शहाजी राजाराम (4,423), थोरात हिम्मत महादेव (4,420), पाटील तानाजी पांडुरंग (4,416), तर पराभूत उमेदवार – विष्णू पांडू जाधव (1,239), भगवान दत्तात्रय थोरात (1,214), कुमार पांडुरंग पाटील (1,194), शंकर आण्णा पाटील (1,316), सुरज सर्जेराव पाटील (1,292), महादेव बापू शेवाळे (1,288), मारूती शामराव शेवाळे (1,302), सदानंद नाथा शेवाळे (1,272). महिला राखीव मधून विजयी- पाटील वर्षा प्रकाश (4,671), पाटील विमल संजय (4,613), तर पराभूत- वर्षाराणी विक्रांत थोरात (1,338), वैशाली भानुदास थोरात (1,275). अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातून विजयी- यादव राहुल वसंत (4, 669), पराभूत- जगन्नाथ विष्णू सोरटे (1,352). वि. जा. भ. ज./ विशेष मागास प्रवर्गातून विजयी- पोळ अशोक लक्ष्मण (4,700) तर पराभूत-अशोक शंकर भोसले (1,328). इतर मागास राखीव मतदार संघातून विजयी- माळी नरेंद्र शंकर (4576), तर पराभूत- जगन्नाथ सदाशिव माळी (1,467) अशी मते मिळालेली आहेत.