औरंगाबाद । जिल्ह्यात आजपासून सुरु होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण काल रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी केली. जिल्हाधिकारी चव्हाण आणि पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. त्यामुळे औरंगाबादकरांची लॉकडाऊनपासून सुटका झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
शहरात ३० मार्च ते ८ एप्रिल अशा १० दिवसांसाठी मर्यादित स्वरुपाचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यानंतर त्यात काहीसा बदल करुन तो ३१ मार्च ते ९ एप्रिल असा करण्यात आला होता. या लॉकडाउनची तयारी प्रशासनाबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनी देखील करून ठेवली होती. औरंगाबादकरांनी गरजेचे सामान खरेदी करुन ठेवले होते. मात्र लॉकडाऊन रद्द झाल्याने छोटी दुकाने, बांधकाम व्यवसाय, दुचाकी, तसेच चार चाकी वाहनाची वर्दळ रस्त्यावर सुरु होती. त्याच प्रमाणे लग्न समारंभ आयोजित करण्याची परवानगी असून त्यासाठी आखून दिलेले नियम मात्र काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत.
उद्योजकांना खुश करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लावला जात असल्याची टीका जलील यांनी केली होती. त्यांनी लॉकडाउन विरोधात आंदोलनाचा इशाराच दिला होता. ३१ मार्च रोजी लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आम्ही आंदोलन करू, असे त्यांनी जाहीर केले होते. शहरात जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही पूर्णवेळ सुरु असल्याचे बघायला मिळाले. सामान्य जनतेचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. शिवाय, खासदारांनी पुकारलेल्या मोर्चात गर्दी झाली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा समाजमाध्यमावर वेगात सुरू असल्याचेही दिसून येत होते.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou