हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| निसर्गाचे चमत्कार अद्भुत असतात हे आजवर आपण अनेक प्रसंगातून पाहिले आहे. असाच एक प्रसंग 19 डिसेंबर 2023 रोजी घडला आहे. कोणत्याही एका व्यक्तीला सहसा विश्वास बसणार नाही अशा 2 गर्भ असणाऱ्या एका आईने दोन हेल्दी मुलांना जन्म दिला आहे. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, एका महिलेने तब्बल वीस तासांच्या प्रसूती कळा सहन करून दोन लहान मुलांना जन्म दिला आहे.
संपूर्ण जगामध्ये काही अशा तुरळकच महिला असतील ज्यांना दोन गर्भ आहेत. अशाच एका अमेरिकेत राहणाऱ्या केल्सी हॅचर नावाच्या महिलेने 19 डिसेंबरला आपल्या एका गर्भातून एका बाळाला जन्म दिला तर दुसऱ्या बाळाला दुसऱ्या गर्भातून 20 डिसेंबर रोजी जन्म दिला. केल्सी हॅचरला दोन गर्भाशय होती. या दोन्ही गर्भातून तिने दोन अशा गोंडस मुलींना जन्म दिला आहे. ही बाब खरे तर डॉक्टरांना देखील आश्चर्यचकित करणारी होते. मात्र, दोन्ही बाळे निरोगी निघाल्यामुळे सर्वांना याचा आनंद झाला.
दरम्यान, केल्सी हेचरने काही कालावधीच्या अंतरातच दोन जुळ्या मुलींना जन्म दिला. वैद्यकीय भाषेत अशा मुलींना फॅटरनल जुळे म्हणले जाते. फॅटरनल म्हणजे, दोन वेगवेगळ्या अंड्यापासून जन्मलेले बाळे होय. अशी घटना ज्यावेळी घडते तेव्हा दोन किंवा अधिक अंडी वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे फलित होतात. अशी मुले अनेकवेळा सारखी देखील दिसतात. याच्या उलट एकाच अंड्यातून जन्मलेल्या मुलांना ‘आयडेंटिकल ट्विन्स’ म्हणतात. परंतु या घटनेत केल्सी हेचरने दोन वेगवेगळया गर्भाशयातून दोन मुलींना जन्म दिला आहे. ही गोष्ट एका चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.