हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OnePlus 10 Pro 5G : Amazon वर आता OnePlus कम्यूनिटी सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत OnePlus चे स्मार्टफोन, आणि स्मार्ट टीव्ही खरेदी करता येतील. जर आपणही नवीन 5G फोन घेणार असाल तर इथे आपल्याला अनेक चांगल्या ऑफर्स मिळतील. हे लक्षात घ्या कि, या सेलमध्ये ग्राहकांना चांगल्या ऑफरमध्ये OnePlus 10 Pro 5G खरेदी करता येईल. Amazon वरील या सेलमध्ये ग्राहकांना OnePlus 10 Pro 5G 55,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल. याची खास बाब अशी कि, इथे एक्सचेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 10,000 रुपयांची सूट देखील मिळू शकेल.
OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD + Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 20:9 चा आस्पेक्ट रेशो असेल. तसेच या फोनची स्क्रीन 3216×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसहीत येते. हा फोन 2 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज तर, टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळेल.
यासोबतच OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित OxygenOS ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. पॉवरसाठी, या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 50W AIRVOOC आणि 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसहीत येते. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत.
या OnePlus 10 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच याच्या मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिली गेली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये अल्ट्रा एचडीआर, ड्युअल व्ह्यू व्हिडिओ, मूव्ही मोड, प्रो मोड, पोर्ट्रेट मोड, टाइमलॅप्स यांसारखे अनेक कॅमेरा फीचर्स आहेत.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/OnePlus-Volcanic-Black-128GB-Storage/dp/B09V2P9C3S
हे पण वाचा :
सिमकार्डशिवाय Telegram वर साइन अप करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Jio च्या ‘या’ 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत मिळवा फ्री कॉलिंगसहीत अनेक फायदे
ICICI Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार जास्त व्याज
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा