OnePlus 10T लवकरच होणार लॉन्च; पहा फीचर्स आणि किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्याच्या जगात स्मार्टफोन ही काळाची गरज असून अनेक भारतीय मोबाईलचे दिवाने आहेत. नवनवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. मोबाईलच्या वाढत्या मागण्यांमुळे कंपन्या सुद्धा सातत्याने नवनवीन मोबाईल फोन लॉन्च करत असतात. त्याच पार्श्वभूमीवर OnePlus 10T हा मोबाईल याच महिन्यात लॉंच होणार आहे. OnePlus 10T भारतात 25 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा फोन Amazon वरून खरेदी करता येईल.

रिपोर्ट नुसार या मोबाईलला 6.7-इंचाचा फुल HD + E4 AMOLED डिस्प्ले असू शकते. हा डिस्प्ले LTPO तंत्रज्ञान आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. तसेच OnePlus 10T ला 160W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,800 mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे.

12 GB रॅम असण्याची शक्यता-

OnePlus 10T ला Asus ROG फोन 6 प्रमाणेच स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट असेल आणि मोबाईलची रॅम 12GB असू शकते.

4,800 mAh बॅटरी-

OnePlus 10T चे एक वैशिष्ट्य म्हणजे ते 256GB अंतर्गत स्टोरेजसह येईल. अहवालानुसार, OnePlus 10T 5G मध्ये एक प्रभावी बॅटरी देखील असेल आणि

50MP कॅमेरा-

OnePlus 10T ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर असेल. य मोबाईलचा फ्रंट कॅमेरा 16MP असेल.

काय असू शकते मोबाईलची किंमत-

जर आपण त्याच्या किंमतीबद्दल बोललो, तर रिपोर्टनुसार, OnePlus 10T ची किंमत 35,500 ते 47,300 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. .

Leave a Comment