OnePlus Nord 4: OnePlus Nord 4 वर तगडी ऑफर !! ग्राहकांना मिळणार स्वस्तात स्मार्टफोन

0
426
OnePlus Nord 4
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । OnePlus Nord 4 – तुम्हाला जर दमदार आणि आकर्षक फीचर्सचा फोन बजेटमध्ये हवा असेल, तर हि संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण OnePlus Nord 4 वर सध्या फ्लॅट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्ससह आकर्षक किंमतीत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी खुशखबर मिळाली आहे. या फोनमध्ये ग्राहकांना 5,500mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह इतर भन्नाट फीचर्सचा अनुभवही घेता येणार आहे.

OnePlus Nord 4 फीचर्स –

डिस्प्ले – OnePlus Nord 4 मध्ये 6.74-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,150 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. यामुळे तुम्हाला उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव मिळतो.

प्रोसेसर आणि रॅम – हा स्मार्टफोन Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरवर चालतो, ज्यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज पर्याय दिले आहेत. त्यामुळे मल्टीटास्किंग आणि मोठ्या स्टोरेजसाठी हा एक आदर्श पर्याय ठरतो.

बॅटरी आणि चार्जिंग – OnePlus Nord 4 मध्ये 5,500mAh ची बॅटरी आहे, जी 100W सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यामुळे तुम्हाला काही मिनिटांतच फोन फुल चार्ज होईल.

कॅमेरा – या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रावाइड सेन्सर आहे, जो उत्कृष्ट फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा अनुभव देतो. तसेच, 16MP चा फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी आदर्श आहे.

किंमत आणि ऑफर्स –

सध्या OnePlus Nord 4 रु 28,999 मध्ये लिस्टेड आहे, ज्यामध्ये आधीच रु 1,000 ची सूट समाविष्ट आहे. यासोबतच, HDFC, SBI किंवा ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास रु 4,000 पर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत रु 24,999 होऊ शकते.

नो-कॉस्ट EMI – तुम्ही 6 महिन्यांसाठी 4,833 रु प्रति महिना EMI पर्यायाद्वारे OnePlus Nord 4 खरेदी करू शकता.

JioPlus फायदे – JioPlus पोस्टपेड युजर्सना 2,250 रु पर्यंतचे अतिरिक्त फायदे मिळू शकतात.

स्क्रीन प्रोटेक्शन – ग्राहक 1,999 रुपयामध्ये एक वर्षासाठी स्क्रीन प्रोटेक्शन प्लॅन देखील घेऊ शकतात.

OnePlus ने आकर्षक एक्सचेंज ऑफर देखील दिली आहे