OnePlus Nord N300 : OnePlus ने लॉन्च केला दमदार मोबाईल; 20 हजारांपेक्षाही कमी किंमत

OnePlus Nord N300
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल (OnePlus Nord N300) निर्माता कंपनी oneplus ने आपला Nord N300 मोबाईल लॉन्च केला आहे. विशेष म्हणजे हा वनप्लसचा स्वस्त स्मार्टफोन असेल. कारण या 5G मोबाईलची किंमत 20 हजारांपेक्षाही कमी आहे. आज आपण जाणून घेऊया या मोबाईलची काही खास फीचर्स बाबत…..

OnePlus Nord N300

डिस्प्ले – (OnePlus Nord N300)

Oneplus च्या या स्मार्टफोनला 90Hz रिफ्रेश रेटसह 6.65-इंचाचा HD + LCD डिस्प्ले आहे. हा मोबाईल Android 13-आधारित OxygenOS 13 वर चालतो. मोबाईलमध्ये MediaTek Dimensity 810 चिपसेट देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह सुसज्ज आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते .

OnePlus Nord N300

ड्युअल कॅमेरा सेटअप-

कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, (OnePlus Nord N300) मोबाईलच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. यासोबत 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus Nord N300

किंमत –

या स्मार्टफोनला 4GB रॅमसह 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. मोबाईल मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी, यात 5G SA/NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.1 आणि USB Type-C पोर्ट आहे. OnePlus कडून OnePlus Nord N300 ची किंमत 18,880 रुपये ठेवण्यात आली आहे. सध्या हा स्मार्टफोन फक्त अमेरिकेत लॉन्च झाला आहे.