अकोला । मागील महिन्यात केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा अध्यादेश काढला होता. केंद्राच्या या निर्णयाला राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला भाजपमध्येही विरोध वाढताना दिसतोय. केंद्राच्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनीही विरोध दर्शवला आहे.
केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी दिली आहेत. ते अकोल्यात केंद्राच्या कृषी विधेयकावर माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकार कांदा निर्यातबंदीचा निर्णय लवकरच मागे घेणार असल्याचे संकेत धोत्रेंनी दिली आहेत. कांदा निर्यातबंदीला महाराष्ट्रातील सर्वांचाच विरोध असल्याचं संजय धोत्रेंना स्पष्ट केलं. सध्याचा विरोध पाहता किमान आधारभूत किंमतीवर स्वतंत्र कायदाच करावा लागेल, अशा परिस्थिती असल्याचं धोत्रे म्हणाले.
दरम्यान, राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच असल्याचं धोत्रे म्हणाले. परंतु, बच्चू कडूंची हमी कोण घेणार?,असा सवालही धोत्रेंनी केला. बच्चू कडूंनी कृषी कायद्यात केंद्राने दोन बदल केल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याचं काल वक्तव्य केलं होतं. या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या सूचनांवर विचार करणार असल्याचं धोत्रे म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.