कांदा लिलाव ठप्प पडल्याने ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी अडचणीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्याने नाशिक जिल्ह्यातील बहुतेक बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. शेतकरी सणासुदीच्या दिवसात अडचणी आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत आज ९० टक्के कांदा खरेदी बंद राहणार आहे. शासनाने केवळ २५ टन कांदा साठवणूक करण्याचे निर्बंध लागू केल्याने व्यापार होणार ठप्प आहे. केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे व्यापारी कांदा खरेदीत सहभाग घेणार नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश मिळत नाही तोपर्यंत मोठ्या व्यापाऱ्यांची शेतकऱ्याकडून कांदा खरेदी न करण्याची भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी प्रशासकीय आदेशांनंतर खरेदी सुरू होणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते. कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळे व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या 25 टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळे साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे.

खरंतर, देशातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कांदासुद्धा येत्या काळात सर्वसामान्यांच्या डोळ्यांत पाणी आणणार आहे. जर कांद्याचे भाव सध्याच्या गतीने वाढत राहिले तर यंदा दिवाळीत कांद्याचे दर खूपच भडकू शकतात. किरकोळ बाजारात सध्या कांदा 40-50 रुपये किलोनं मिळतोय. देशातील सर्वात मोठा कांदा बाजार असलेल्या नाशिकमधील लासलगाव येथे गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव प्रति क्विंटल 6802 रुपयांवर पोहोचला होता. कांद्याचा हा सर्वाधिक भाव आहे. येत्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर 100 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in