देशात कांदा २२ रुपये किलो दराने विकला जात आहे-केंद्रीय मंत्री रामविलास पासवान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । कांद्याच्या दराने गेल्या काही महिन्यापासून उचांक गाठला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये महागाई दरात वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीनुसार सांगण्यात आलं. दरम्यान कांद्याच्या वाढलेल्या दरापासून सामन्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या वतीने आयात करण्यात आलेला कांदा नाफेड आणि राज्य सरकारांमार्फत विशेष स्टॉल लावून कमी किंमतीत कांदा विकला जात आहे. देशातील मागणी पाहता १८ हजार टन कांदा आयात करण्यात आला असून तो सध्या २२ रुपये प्रति किलोने विकला जात आहे, अशी माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, अद्यापही सर्वसामान्य ग्राहकांना ७० रुपये प्रति किलोनेच किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध आहे.

सरकारने आजपर्यंत १८ हजार टन कांदा आयात केला आहे. मात्र, अनेक प्रयत्न करुनही आत्तापर्यंत कवेळ २००० टन कांद्याचीच विक्री होऊ शकली आहे. कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार हरएक प्रयत्न करीत आहे. आसाम (१०,००० टन), महाराष्ट्र (३४८० टन), हरयाणा (३००० टन) आणि ओडिशा (१०० टन) या राज्यांनी कांद्यांची मागणी केली होती. मात्र, आता या राज्यांनी आयात करण्यात आलेला कांदा खरेदी करण्यास नकार दिल्याचेही पासवान यांनी सांगितले.

 

सन २०२० साठी कांद्याचा बफर स्टॉक वाढवून १ लाख टन करण्यात येणार असल्याचेही पासवान यांनी सांगितले आहे. सरकारच्यावतीने नाफेड कांद्याचा बफर स्टॉक तयार करते. नाफेड गेल्या मार्चपासून जुलै महिन्यापर्यंत रब्बीच्या मोसमात तयार होणारा कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार आहे.

Leave a Comment