हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन। अनेक वेळा असे म्हंटले जाते की , स्त्रियांचे सौदर्य हे केसांमध्येच जास्त असते . त्यामुळे प्रत्येक स्त्री ही आपले केस लांब आणि मजबूत असावे यासाठी विशेष प्रयत्न करत असते. मजबूत आणि लांब केसांसाठी असे कोणते उपाय आहेत, त्याची माहिती आज आपण येथे घेणार आहोत.
कांदा हा जसा आहारात महत्वपूर्ण आहे. तसेच केसांच्या वाढीसाठी सुद्धा कांदा हा फायदेशीर आहे. लहान वयातील मुलींना शाळेमध्ये वेण्या घालून जावे लागते . नियमित पणे खोबरेल तेलाचा वापर केल्याने सुद्धा केस काळे राहण्यास मदत होते. खोबरेल तेल आणि कांदा रस याचा वापर कोठे आणि कसा करावा याची माहिती घेऊया….
कांद्याच्या रसात सल्फर असते, जे आपल्या डोक्यातल्या छिद्रांना पोषण देते आणि ते पुन्हा सक्रिय करण्यात मदत करते. सल्फर केस पातळ होण्यापासून आणि तुटण्यापासून देखील प्रतिबंधित करते. कांद्याच्या रसातील अँटीऑक्सिडंट केस पांढरे होण्यापासून देखील प्रतिबंधित करते. आपण केस वाढविण्यासाठी शॉर्टकट शोधत असल्यास, वर वर्णन केल्यानुसार कांद्याचा रस वापरा.
खोबरेल तेल आणि कांदा—-
एक लहान वाटी घ्या आणि 2 चमचे कांद्याचा रस, 2 चमचे नारळ तेल आणि 5 थेंब टी-ट्री तेल मिसळा. त्यांना चांगले मिसळा आणि हे तेल आपल्या टाळूवर लावा. 2 मिनिटांसाठी मसाज करा आणि नंतर शॉवर कॅपने झाकून ठेवा. 30 मिनिटे थांबा आणि नंतर सौम्य शैम्पू वापरुन आपले केस धुवा. खोबरेल तेलामध्ये विशेषत: अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आढळतात, ज्यामुळे डोक्यातील कोंडापासून मुक्त होऊ शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’