सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. राज्यातील नव्हे तर चक्क देशातील सर्वात उच्चांकी दर कांद्याला मिळाला आहे. सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी कांद्याला चक्क २०,००० हजार रूपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. प्रति क्विंटल ला इतका दर मिळाल्यामुळे सर्वांच्या नजरा सध्या कृषी सोलापूरकडे वळल्या आहेत. कांद्याला मिळालेला आजवरचा हा विक्रमी दर आहे.
एवढ्या विक्रमी दरामध्ये कांदा विकण्याचे भाग्य सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट येथील एका शेतकऱ्याला मिळाले आहे. शिवानंद पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील शिवानंद फुलारी यांनी दोन एकर कांदा लागवड केली होती. दीड एकरापेक्षा अधिक क्षेत्रावरील कांदा काढणी केल्यानंतर त्यांनी तो विकण्यासाठी बाजार समितीमध्ये आणला.
दरम्यान यापूर्वी सलग तीन दिवस सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत आवक झालेल्या कांद्याला कमाल १५ हजारा इतका दर मिळाला होता. हा उच्चांकी दर राज्यात सर्वाधिक मानला जात असताना गुरुवारी त्यात आणखी भर पडून कांद्याला प्रतिक्विंटल उच्चांकी २० हजार रुपये दर मिळाला.