कांदे कमी खायला सांगणारं सरकार गेलेच पाहिजे – पी. चिदंबरम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । कांद्याच्या भावाबाबत देशात खळबळ उडाली आहे, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे म्हणणे आहे की मी कांदा खात नाही. म्हणून मला काही फरक पडत नाही. अर्थमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आक्रोश वाढला आहे. त्यामुळे १०६ दिवसांनंतर तुरूंगातून बाहेर आलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम म्हणतात की ज्या सरकारने कमी कांदा खाण्यास सांगितले आहे. ते सरकार गेले पाहिजे.

पी. चिदंबरम यांनी गुरुवारी संसद भवन गाठले आणि हे सरकार लोकांना कांदा आणि लसूण कमी खाण्याचा सल्ला देणारे सरकार आहे, ते गेलेच पाहिजे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. असं पी. चिदंबरम यांनी सांगितलं. गुरुवारी कॉंग्रेस पक्षाने संसद भवनाच्या आवारात जोरदार निदर्शने केली. पी. चिदंबरम यांनीही यात भाग घेतला आणि सरकारचा विरोधात घोषणा दिल्या.

पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर बुधवारी तुरूंगातून बाहेर आले. ते आज राज्यसभेच्या कामकाजात भाग घेणार आहेत. दरम्यान बुधवारी लोकसभेच्या कार्यकाळात अर्थमंत्री निर्मला सीतारमण भाषण करत असताना त्यांनी कांद्यावर हे भाष्य केल. कॉंग्रेसच्या नेत्याच्या कांद्याच्या प्रश्नावर निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले, ” मी इतका कांदा खात नाही. त्यामुळे मला काही फरक पडत नाही” असं त्यांनी यावेळी सांगितलं होत.

 

Leave a Comment