सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यात सध्या कांदा किरकोळ विक्री 40 रुपये आणि टोमोटो 15 रुपये इतका दर आहे. मात्र मिरजेत चक्क 2 रुपये किलोने विकला गेला. यावेळी दोन टन कांदा आणि टोमॅटोची विक्री झाली. 2 रु किलोचा आवाज घुमताच बघता बघता ग्राहकांची खरेदीसाठी झुबंड उडाली. व्यापाऱ्यांच्या इर्षेतुन ग्राहकांचा फायदा झाला. मात्र यावेळी व्यापाऱ्यांच्या दोन गटात राडा झाला.
नेहमी टोमॅटो विकणारा आज कांदा का विकतो म्हणून ईर्षा करून 40 रु किलोचा कांदा 2 रु ने किलो विक्री केला. यावेळी दोन गट आमने सामने आले आणि त्यांच्यात वादावादी आणि राडा झाला. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी गर्दी पांगवली.
कांदा आणि टोमॅटोचे दर व्यापाऱ्यांच्या आपसातील इर्षेमुळे कमी करण्यात आले असले, तरी कोरोनाच्या काळामध्ये गोरगरीब ग्राहकांना कमी दरात आम्ही कांदा घेतल्याचा दावा व्यापारी करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’