Online Loan App : मोबाईल App वरून कर्ज घेताय? सावधान!! फ्रॉडपासून बचावासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Online Loan App) आर्थिक अडचणी काही सांगून येत नाहीत. त्यामुळे कधी कोणत्या कारणामुळे पैशांची गरज लागेल काही सांगू शकत नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात अचानक पणे एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते. जेव्हा तातडीची पैशांची गरज असते. अशावेळी कुणा नातेवाईक, मित्र मंडळींकडे देखील आपल्याला गरज आहे इतकी रक्कम असेलच याची काही खात्री नसते. त्यामुळे निर्माण झालेली पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा उभा करायला अनेक लोक बँका किंवा इतर वित्तीय संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेतात. मात्र, अनेकदा बँक आणि वित्तीय संस्थांचा कर्जप्रक्रिया खूप मोठ्या असल्याने वेळ जातो. ज्यामुळे आपत्कालीन वेळेत पैसा उभा राहत नाही.

नाईलाजाने अशा परिस्थितीत लोक झटपट कर्ज मिळण्याचे इतर पर्याय शोधतात. ज्यामध्ये ऑनलाईन मोबाईल App चा समावेश आहे. आजकाल मोबाईलवर उपलब्ध असणाऱ्या अनेक ॲप्सच्या माध्यमातून अगदी सहज आणि ताबडतोब मोठ्या रकमेचे कर्ज मिळते. त्यामुळे अनेक बँका तसेच नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या ज्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ताबडतोब कर्ज देतात या पर्यायाचा वापर केला जातो.

(Online Loan App) कमी वेळात, मोजक्या कागदपत्रांच्या सहाय्याने मोबाईल ॲप्लिकेशन वरून झटपट कर्ज घेणे लोकांना सोपे वाटते. मात्र असे कर्ज घेताना फ्रॉड होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही अडकू नये म्हणून काही महत्वाच्या गोष्टींची आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. ती जाणून घ्या आणि सावधगिरी बाळगा.

‘या’ गोष्टींची काळजी घ्या (Online Loan App)

जर तुम्ही ऑनलाईन लोन घेत असाल तर तो App किती विश्वासार्ह आहे ते आधी तपासा. माहित असलेला आणि रिव्ह्यू पाहूनच App वापरा. यात बजाज फायनान्स, टाटा फायनान्स, श्रीराम फायनान्स आणि महिंद्रा फायनान्स हे App चांगले असल्याचे सिद्ध झाले आहे.

(Online Loan App) तुम्ही ज्या App वा कंपनी साईटवरून लोन घेताय ती साईट आरबीआयकडे नोंदणीकृत आहे का? याची देखील पडताळणी करा.

ऑनलाईन एप्लीकेशनवर कर्ज देण्यासाठी कर्जाच्या अटी, व्याजदर तसेच परतफेडीचा कालावधी आणि इतर चार्जेस काय आहेत? याचा तुलनात्मक अभ्यास करा. तसेच काही हिडन चार्जेस आहेत का? ते देखील तपासा.

कर्ज घेताना त्याचा ईएमआय येईल ते देखील तपासा. तसेच आपला सिबिल स्कोर पाहून तुम्हाला कोणत्या व्याजदरात कर्ज दिले जात आहे आणि तो व्याजदर योग्य आहे का? याची देखील पडताळणी करा. (Online Loan App)

महत्वाचे असे कि, आपल्याला किती कर्जाची गरज आहे? ते पाहून तितकेच कर्ज घ्या. अनावश्यक वाढीव रक्कम घेऊ नका. तसेच आपण जे कर्ज घेत आहात त्याचा ईएमआय आपल्याला देणे शक्य आहे का हेदेखील पाहून घ्या.

तुम्ही ज्या App वरून कर्ज घेत आहात त्यावर विचारले जाणारे प्रश्न किंवा नियम, अटी जर संशयास्पद वाटल्या तर वेळीच सावध व्हा. (Online Loan App)