नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता देशात लसीकरण मोहीम तीव्र करण्यात आली आहे. येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. ही ऑनलाईन नोंदणी कुठे करायची? त्याचे रजिस्ट्रेशन केव्हा पासून सुरु होईल? या सर्वांची माहिती जाणून घेऊया…
येत्या 1 मे पासून 18 ते 45 वर्षे वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी Aarogya Setu ॲप, UMANG ॲप, किंवा cowin.gov.in या वेब पोर्टल द्वारे कोरोना लसीची ऑनलाईन नोंदणी करू शकता. करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. 28 एप्रिल म्हणजेच आज बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून लसीकरणासाठी तुम्ही नोंदणी करू शकता. याबरोबरच सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे की 1मे रोजी राज्य शासकीय केंद्र आणि प्रायव्हेट सेंटर वरती किती लसीकरण केंद्रे तयार आहेत. यावर लसीकरण अवलंबून असेल.
Registration for 18 plus to begin on https://t.co/GAlicKy5QI, Aarogya Setu App & UMANG App at 4 PM on 28th April. Appointments at State Govt centers & pvt centers depending on how many vaccination centers ready on 1st May: Aarogya Setu #COVID19 pic.twitter.com/h882EyRSdl
— ANI (@ANI) April 28, 2021
आरोग्य सेतु Aarogya Setu अॅपद्वारे नोंदणी कशी करावी
१.आरोग्य सेतू Aarogya Setu अॅप उघडा आणि होम स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या (CoWIN tab) कोविन टॅबवर क्लिक करा.
२)‘लसीकरण नोंदणी’ ‘(Vaccination Registration)’ निवडा आणि नंतर आपला फोन नंबर प्रविष्ट करा. आपल्याला एक ओटीपी (OTP) प्राप्त होईल आणि नंतर आपण Verify’ वर क्लीक करून पुढे जाऊ शकता.
३)पुढच्या पानावर फोटो आयडी पुरावा, नाव, लिंग आणि जन्म वर्षासह सर्व तपशील प्रविष्ट करा. ‘नोंदणी’ (Register)वर क्लिक करा.
४)तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट शेड्यूल (Schedule) करण्याचा पर्याय मिळेल. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावाच्या शेड्यूलवर(Schedule) क्लिक करा.
५)आपला पिन कोड जोडा आणि search पर्यायावर क्लिक करा. जोडलेल्या पिन कोडमधील केंद्रे दिसून येतील.
६)तारीख आणि वेळ निवडा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.
कोविन CoWIN पोर्टलद्वारे नोंदणी कशी करावी
१)कोविन वेबसाइटला भेट द्या आणि Register/Sign in वर क्लिक करा.
२)तुमचा मोबाईल नंबर टाइप करा आणि GET OTP वर क्लिक करा. OTP प्राप्त झाल्यानंतर, साइटवर अंक टाइप करा आणि ‘Verify’ वर क्लिक करा.
३)आता तुमची सर्व माहिती भरा. तुमचा फोटो, आयडी पुरावा, नाव, लिंग आणि जन्म वर्षासह आपले सर्व तपशील प्रविष्ट करा. एकदा हे झाल्यावर, नोंदणी ‘Register’ दाबा.
४)तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अपॉईंटमेंट शेड्यूल करण्याचा पर्याय मिळेल. नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या नावापुढे ‘Schedule’ वर क्लिक करा.
५)आपला पिन कोड जोडा आणि search पर्यायावर क्लिक करा. जोडलेल्या पिन कोडमधील केंद्रे दिसून येतील.
६)तारीख आणि वेळ निवडा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.
ही बाब लक्षात घेणे महत्वाचे आहे की, वापरकर्ते एकाच लॉगिनद्वारे चार सदस्यांची नोंदणी करू शकतो. आणि सहजपणे भेटीचे वेळापत्रक निश्चित करू शकतात.