हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पेटीएम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या पेटीएमने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स क्षेत्रात प्रगती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच पेटीएमने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स हे नवे फीचर्स आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून खाद्यपदार्थ, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन अशा विविध गोष्टींची शॉपिंग करता येणार आहे. कसे असेल हे फीचर चला जाणून घेऊयात.
ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवत पेटीएम ONDC शॉपिंग अॅप आणले आहे. या नवीन फीचरच्या अंतर्गत, पेटीएमने आपल्या होमपेजवर QRcode च्या पुढे ONDC चा पर्याय दिला आहे. या पर्यायावर क्लिक करून पेटीएम वापर करताना सहजरित्या शॉपिंग करता येऊ शकते. फळेभाज्या असो कपड्यांची खरेदी असो किंवा इतर कोणतीही खरेदी करणे ONDC मुळे सहज शक्य होणार आहे.
ONDC वरून करता येईल शॉपिंग
पेटीएम ॲपच्या होम पेजवर ONDC हा पर्याय दिसून येईल. ONDC वर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्यावर ‘Paytm Love ONDC’ असे लिहलेले असेल. या पेजवरून ऑनलाइन पद्धतीने वस्तूंची खरेदी करता येईल. ONDC खरेदी केल्यास पेटीएम आपल्याला अनेक वस्तूंवर ऑफर आणि सूट देईल. थोडक्यात, ज्या पद्धतीने आपण मी मेशो ॲमेझॉन अशा ॲपवरून खरेदी करतो त्याच पद्धतीने ONDC वरून वस्तूंची खरेदी करता येईल.
दरम्यान, सध्या ONDC फीचर ट्रायल बेसिसवर सुरू करण्यात आले आहे. या नव्या फीचरच्या माध्यमातून पेटीएम कंपनी ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. यामुळे पेटीएम वापरतात त्यांची संख्या वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मुख्य म्हणजे, ONDC मुळे वापरकर्त्यांचा देखील पेटीएम वापरण्यासंदर्भात रस वाढेल, अशी शक्यता दर्शवली जात आहे.