केवळ 14 टक्केच औरंगाबादकर झाले ‘लसवंत’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | मागील सहा महिन्यात कोरोना लसीकरणाचा मुबलक साठा उपलब्ध होत नसल्याने शहरातील केवळ 1 लाख 71 हजार नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. त्यामुळे केवळ 14.55 टक्के औरंगाबाद करांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी 70 टक्के नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे मनपाला अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात 16 जानेवारीपासून केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तोरणाचे लसीकरण सुरू झाले लसीकरण सुरू होऊन महिना उलटत नाही. तोच कोरोना च्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला यादरम्यान लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मनपाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली. मात्र लसींच्या पुरवठा मागणीपेक्षा कमी प्रमाणात होत असल्याने लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला.

प्राप्त अहवालानुसार शहराची लोकसंख्या सोळा लाख गृहीत धरली असून त्या प्रमाणात 70 टक्के म्हणजे 11 लाख 76 हजार 999 इतक्या नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले. 16 जानेवारी ते 1 ऑगस्ट या सहा महिन्यांच्या कालावधीत आरोग्य कर्मचारी ऑनलाईन वर्कर्स 18 ते 44 वयोगट, 45 वर्षांवरील तसेच 60 वर्षांवरील एकूण 5 लाख 86 हजार 932 जणांचे लसीकरण झाले आहे. मात्र यापैकी केवळ एक लाख 71 हजार 281 नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस मिळालेला आहे.

Leave a Comment